स्त्री जन्मा ही तुझी कहाणी –
बालिका, मुग्धा, युवती, प्रेयसी, पत्नी, माता – स्त्री आपल्या जीवनात अशा विविध स्थित्यंतरांतून जात असते. हे प्रत्येक स्थित्यंतर इतकं मोहक आणि महत्वाचं असतं की ते काव्यबद्ध करावं अशी अनेकांना इच्छा झाली. अनेक कविंनी त्यावर कविता रचल्या, संगीतकारांनी त्यातील काही स्वरबद्ध केल्या आणि प्रख्यात गायकांनी सुमधूर आवाजांत त्या गायल्या. त्यामुळे स्त्री जीवनावर आधारित अशा भावगीतांचा अनमोल नजराणा आपल्याकडे आहे. त्यातीलच काही निवडक गीतांमधून उलगडत जाणार आहे.
स्त्री जन्माचीकहाणी.
ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम सादर करणार आहेत आपलेच आर्टिस्ट पण एका महत्वाच्या उद्देशाने. आणि तो उद्देशआहे पूरग्रस्तांना मदत करणे. कार्यक्रमास प्रवेश मोफत आहे परंतु ऐच्छिक देणगी दिल्यास नुकत्याच झालेल्या पुरामुळे न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलॅंड येथील पूरग्रस्तांना ही मदत पाठवली जाईल. स्त्री हा जरी कार्यक्रमाचा विषय असला तरी कार्यक्रम केवळ स्त्रियांचा, स्त्रियांसाठी नसून सर्व रसिकांना आवडतील अशी निवडक गाणी आपल्याच कलाकारांच्या सुमधूर गायनामधून ऐकण्याचा आनंददायी योग आहे. तेंव्हा ७ मे ची दुपार त्यासाठी जरूर राखून ठेवा.
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
संकल्पना आणि निवेदन – डॅा. शोभा लिमये
गायिका – अजिता ठाकूर आणि अश्विनी घैसास
साथ संगत – हार्मोनियम – प्रसन्न ताम्हनकर, तबला – किरण मंडपे
दिनांक – ७ मे २०२२
वेळ – Doors Open at 2 pm for a 2.30 pm start. The event concludes at 5.30 pm
स्थळ – Burnside Ballroom, 401 B 26, Tusmore, S.A. 5065